Latest Marathi News
Ganesh J GIF

आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, या खेळाडूची एंट्री

या खेळाडूला वगळल्याने आश्चर्य, भारताचा पहिला सामना पाकिस्तानबरोबर, पहा भारतीय संघ

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- अखेर अनेक संकट झेलत आशिया चषक स्पर्धेला मुहूर्त मिळाला आहे. येत्या ३० ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे. दरम्यान, यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २ सप्टेंबरला आशिया चषकात पहिला सामना खेळणार आहे. बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी दिल्लीत बैठकीनंतर स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे.

बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी भारतीय संघाची घोषणा केली आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर परतले आहेत. तर युझवेंद्र चहलला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २ सप्टेंबरला आशिया चषकात पहिला सामना खेळणार आहे. हा सामना पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेतील कॅंडी येथे होणार आहे. यानंतर भारताचा दुसरा गट सामना ४ सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि नेपाळ एकाच गट-अ मध्ये आहेत. आशिया कप पाकिस्तानच्या यजमानपदाखाली हायब्रिड मॉडेलच्या आधारे खेळवला जाणार आहे. तिलक वर्मा प्रथमच एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. इशान किशन आणि केएल राहुल यांचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना संघात स्थान दिले आहे. संजू सॅमसनला बॅकअप खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाले आहे. हार्दिक पांड्याच्या उपकर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, मात्र त्याला उपकर्णधारपदावर कायम ठेवण्यात आले आहे. दरम्यान युझवेंद्र चहलचा संघात समावेश न केल्याने सर्वांनींच आश्चर्य व्यक्त केले आहे.

आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर , सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा. संजू सॅमसन(रिजर्व)

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!