Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात महिला सुरक्षितच! पुणे पोलीस अॅक्शनमोडवर

तरुणीवर कोयता हल्ला झाल्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे महत्वाचे निर्णय, पुणेकर राहणार सुरक्षित

पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यात सदाशिव पेठेत मुलीवर झालेल्या कोयता हल्ल्याने एकच खळबळ उडाली होती. तरूणांच्या धाडसामुळे ती तरूणी बचावली आहे. पण वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारानंतर पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पण आता या घटनेनंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

दर्शना पवार हत्याकांड, एकतर्फी प्रेमातून कोयता हल्ला, कोयता गँगचा धिंगाणा, अपरात्री होणारी गाड्यांची तोडफोड यामुळे पुणे शहरात गुन्हेगारीला ऊत आला होता. कोयता गँगचा विषय तर विधानसभेत देखील चर्चिला गेला होता. त्यामुळे पुणे पोलिसांवर नाचक्कीची वेळ आली होती. काल जर तरुणीबरोबर काही बरे वाईट घडले असते तर पुणे पोलीसांच्या मर्यादा उघड झाल्या असत्या, त्यामुळे आता पुणे पोलीस जागे झाले असून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी स्वतः याबाबत खबरदारी घेत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार आता पुणे शहरातील सर्व पोलीस चौक्या २४ तास आणि सातही दिवस सुरू ठेवण्याचा महत्वाचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. त्याचबरोबर प्रत्येक पोलीस चौकी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणणे, शिवाय आणखी १५० बीट मार्शल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील २५ बीट मार्शल दामिनी पथकासाठी असणार आहेत. याशिवाय प्रत्येक तक्रारीकडे काळजीपूर्वक पाहण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. गुन्हेगारीचे नाही हे सिद्ध करण्यासाठी पुणे पोलीस सज्ज झाले आहेत. दरम्यान तरुणीवर कोयता हल्ला करणाऱ्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. विश्राम बाग पोलिसांनी या आरोपीचा ताबा घेतला असून अधिक तपास करत आहे. तर तिला वाचवणाऱ्या लेशपाल जवळगेचे काैतुक होत आहे.

पुण्यात देश विदेशातील अनेक तरूण तरुणी शिक्षणासाठी येत असतात. पण काल घडलेल्या घटनेनंतर पुणे मुलीसांठी अनसेफ असल्याचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे पुणे पोलीसांनी विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. घेतलेले निर्णय तत्परतेने अमलात असल्यास निश्चितच पुणे सुरक्षित असल्याचे सिद्ध होणार आहे. त्यामुळे पुणे पोलीस किती तत्परतेने यावर काम करणार यावर पुढील दिशा ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!