Latest Marathi News
Ganesh J GIF

टाॅलीवूडपासून बाॅलीवूड गाजवणारी अभिनेत्री घेणार घटस्फोट?

इन्टाग्रामवरील त्या कृतीने ब्रेकअपच्या चर्चा, पोस्टकरत अभिनेत्री म्हणाली पुन्हा एकदा ती वेळ आठवली...

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंतच्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने मोठे नाव कमावलेल्या अभिनेत्री असीनच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या चर्चेत आहेत. असीन तिच्या पतीला घटस्फोट देऊ शकते असे बोलले जात आहे. असिनचे पती राहुलसोबतचे ब्रेकअप झाल्याच्या अफवा गेल्या अनेक दिवसांपासून पसरत आहेत.

असिनने तिच्या पतीसोबतचे तिचे फोटो इंस्टाग्रामवरूनडिलीट केले होते.त्यानंतर अभिनेत्रीचे वैवाहिक जीवन चांगले चालत नसल्याची अफवा पसरली होती. असिन आणि राहुलने २०१६ मध्ये एकमेकांशी लग्न केले होते. राहुल शर्मा हा देखील व्यवसायाने व्यावसायिक असून मायक्रोमॅक्स कंपनीचा सहसंस्थापक आहे. लग्नानंतर असिनने स्वतःला अभिनयापासून दूर ठेवले. त्यानंतर २०१७ मध्ये तिला एक मुलगीही झाली. तिचे नाव अरिन आहे. पण यावर आता असिनने प्रतिक्रिया दिली आहे. तिने या अफवा असल्याचे जाहीर केले आहे. ती आपल्या पतीसोबत सुटी इन्जाॅय करत आहे. अत्यंत काल्पनिक आणि पूर्णपणे निराधार असल्याचा दावा तिने केला आहे. “समर हॉलिडेमध्ये आम्ही दोघेही समोरासमोर बसून नाश्ता करत असताना कोणतेही सत्य नसलेली बातमी वाचली. आज पुन्हा एकदा ती वेळ आठवली जेव्हा आमची कुटुंबे आमच्या लग्नाची तयारी करत होती आणि आमचं ब्रेकअप झाल्याची बातमी कुणीतरी दिली होती. एवढ्या चांगल्या व्हेकेशनमधील पाच मिनिटं वाया घालवल्याचं वाईट वाटतंय. तुम्हा सर्वांचा दिवस चांगला जावो,” असं असिनने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे तिच्या घटस्फोटाच्या बातम्या अफवा ठरल्या आहेत.

असिनने २००१ मध्ये मल्याळम चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. बॉलिवूडमध्ये असताना असिनने आमिर खानच्या गजनी या चित्रपटातून पदार्पण केले होते. साऊथ चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही त्याने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली होती. तिचा शेवटचा चित्रपट ‘ऑल इज वेल’ २०१५ मध्ये रिलीज झाला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!