Latest Marathi News
Ganesh J GIF

आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिलांचे ओठ आणि गाल पाहिले जातात

या अभिनेत्रीचे चित्रपटसृष्टीतील काळ्या बाजूबद्दल भाष्य, म्हणाली अभियनापेक्षा तुमच्या...

मुंबई दि २(प्रतिनिधी)- प्राइम व्हिडिओवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘जुबली’ ही वेबसीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. १९४० ते १९५० या काळातील मुंबईतील चित्रपटसृष्टीचा प्रवास आणि एका मोठ्या फिल्म स्टुडिओची कहाणी या सीरिजमधून उलगाडण्यात आली आहे.


अभिनेत्री वामिका गब्बी हिने या वेब सिरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण तिने दिलेल्या एका मुलाखतीच्या दरम्यान वामिकाने सिनेमासृष्टीतील पडद्यामागील गोष्टीवर धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्या मनोरंजनसृष्टीत आजही अभिनेत्रीच्या दिसण्याला प्रचंड महत्त्व आहे असं तिने स्पष्टपणे या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली “आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आज देखील महिलांच्या सुंदर चेहेऱ्याला प्रचंड महत्त्व दिले जात आहे. महिलांचे ओठ आणि गाल अगदी परफेक्ट असले पाहिजे, म्हणजे झालं. मी स्वतःला या अशा गोष्टींपासून खूप लांब ठेवले आहे. फिल्म इंडस्ट्रीत लोक सुंदर दिसण्यासाठी काहीपण करत असतात, पण मी मात्र जे परफेक्ट नाही, अशा लोकांकडे आकर्षित होत असते. मी जशी आहे तशीच स्वतःवर प्रेम करते. असे वामिका म्हणाली आहे.

‘जुबली’ वेबसीरिजमध्ये वामिकाने निलूफर हे पात्र साकारलं आहे. या सिरिजमध्ये वामिकासह सिद्धांत गुप्ता, अपारशक्ति खुराना, प्रोसेनजीत चॅटर्जी, अदिती राव हैदरी हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये आहेत. वामिका याआधी ‘ग्रहण’ या वेबसीरिजमध्येही दिसली होती. त्यातीलही तिचं काम लोकांना प्रचंड आवडले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!