Latest Marathi News
Ganesh J GIF

‘तू तुझ्या अवकातीत रहा तुझे संस्कार माहित आहेत’

ओमराजे निंबाळकर राणाजगजित एकमेकांशी भिडले, एकेरी उल्लेखाने गोंधळ

उस्मानाबाद दि ३(प्रतिनिधी)- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार जगजित सिंग राणा पाटील यांच्यात आज जोरदार वाद झाला. पिकविम्याच्या मुद्द्यावरून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातच दोघांची शाब्दिक चकमक झाली. यावेळी जास्त बोलू नकोस, तू तूझ्या औकातीत राहा असा इशारा खासदार ओम राजे यांनी आमदार राणा यांना दिला. या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप २०२२ मधील पीक नुकसानीच्या अनुषंगाने २५४ कोटी रुपये विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. पण नुकसान भरपाईच्या रकमेत तफावत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केल्या आहेत. याचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बैठकीला लोकप्रतिनिधींना का बोलवण्यात आले नाही असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी सचिन ओमबासे यांना विचारला पण ते बोलण्या आधीच राणाजगजितसिंह पाटील यांनी “बाळा लोकप्रतिनिधी नसतो रे” असा टोला लगावला यामुळे संतापलेल्या ओमराजे निंबाळकरांनी “तू तू नीट बोल तुझ्या अवकातीत रहा तुझे संस्कार माहित आहेत” असे सुनावले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्यासमोरच हा वाद झाला. तक्रार निवारण सुरु असल्याने शेतकरी देखील यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला शेतक-यांऎवजी फक्त आमदारांसोबरच बैठक सुरू होती त्यामुळे शेतक-यांनी आम्हालाही बैठकीत घ्या असे म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गोंधळ घातला होता. त्यांची बाजू मांडण्यासाठी ओमराजे बैठकीत सहभागी होण्यासाठी गेल्यावर हा वाद झाला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!