Just another WordPress site

प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा काढला काटा

हत्येसाठी वापरलेली पद्धत पाहुन पोलिसही आवक, पत्नी आणि प्रियकर अटकेत

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मुंबईतील सांताक्रूझमधील एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची स्लो पॉयझन देऊन निघृण हत्या केली आहे. गारमेंट व्यावसायिक कमलकांत शाह असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पत्नी काजल शाह आणि तिचा प्रियकर हितेश जैन यांना पोलिसांनी अटक केली आहे. विम्याच्या पैशासाठी हि हत्या करण्यात आली.

GIF Advt

कमलाकांत शहा यांना २४ ऑगस्ट रोजी पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यांना आधी उलट्या झाल्या. त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडून औषधे घेतली पण वेदना कायम राहिल्याने त्यांना अंधेरीच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी अशाच पोटदुखीच्या तक्रारीनंतर त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. शहा यांच्या वेदना कमी झाल्या नाहीत तेव्हा त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्याचे एक एक अवयव निकामी होऊ लागल्याने डॉक्टरांनी त्यांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले.१३ सप्टेंबरला आलेल्या रिपोर्टमध्ये त्यांच्या शरीरात आर्सेनिकचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा ४०० पटीने जास्त, तर थॅलियम साधारण पातळीपेक्षा ३६५ पटीने जास्त असल्याचे आढळले. पण १९ सप्टेंबर रोजी शहा यांचा मृत्यू झाला. पण आर्सेनिक तोंडावाटे कोणी दिले याचा शोध पोलीस घेत होते यावेळी शाह आणि त्यांची पत्नी काजल यांच्यातील संबंध काही ठीक नसल्याचे पोलिसांना समजले. काजलच्या बालपणीचा मित्र हितेश जैनमुळे त्यांच्यात सतत वाद होत होते.त्यामुळे पोलीसांनी तिची चाैकशी केली असता सत्य समोर आले.

कविता आणि हितेश यांना शहाची संपत्ती हडपून स्वतःची सुटका करून घ्यायची होती आणि म्हणून त्यांनी आर्सेनिक आणि थॅलियम मिळवले.कविताने आधी ते सासूला आणि नंतर पतीला दिले. पोलीसांनी काजल आणि शहा यांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. पण पैशासाठी पत्नीनेच ही हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!