Latest Marathi News
Ganesh J GIF

‘मी कधीही धारधार चाकुने वार करेल ते तुला माहितीही पडणार नाही’

या महिला खासदाराला धमकीचे फोन, पोलिसात तक्रार दाखल, लोकप्रतिनिधींना धमक्यांच्या प्रमाणात वाढ

अमरावती दि २२(प्रतिनिधी)- राजकिय वर्तुळातील नेत्यांना धमकीचे फोन येण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आपल्याला धमकीचे फोन येत असल्यामुळे नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत.

अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. राणा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांना एका मोबाईल नंबरवरून विठ्ठल राव नामक व्यक्तीचा फोन येत आहे. या व्यक्तीकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तु गर्दीच्या ठिकाणी जाते ना त्या ठिकाणी मी कधीही धारधार चाकुने वार करेल ते तुला माहितीही पडणार नाही’ अशी थेट धमकी राणा यांना मिळाली आहे. ज्यावेळी धमकीदाराने फोनवर अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप देखील नवनीत राणा यांनी केला आहे. यापूर्वी रवी राणा यांना देखील जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. राणा यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे १६ ऑगस्‍टपासून विठ्ठलराव नावाची व्‍यक्‍ती धमकीचे फोन करत आहे. गेल्‍या वर्षीदेखील हनुमान चालिसा पठण केल्‍यास तुम्‍हाला ठार मारू, अशी धमकी नवनीत राणा यांना देण्‍यात आली होती. या प्रकरणी खासदार नवनीत राणांनी नवी दिल्‍ली येथील नॉर्थ एव्‍हेन्‍यू पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली होती. राणा यांना 088055 41949 या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात आली आहे.

हनुमान चालिसा पठणाने खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा चांगलेच चर्चेत आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या प्रयत्नात दोघांनाही अटक करण्यात आली होती. पोलिसांनी मूळापर्यत जाऊन तपास करावा अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!