वरातीत डीजेच्या तालावर नाचताना तरुणाचा कोसळून मृत्यू
तरूणाचा मृत्यू होतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल,बघा कसा आला मृत्यू
नांदेड दि २६(प्रतिनिधी)- नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वरातीमध्ये डीजेच्या तालावर नाचता नाचता तरुण खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
नांदेडमधील आहे. नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी गावातील विश्वनाथ जाणगेवाड याचा लग्नाच्या वरातीत डीजेच्या तालावर नाचताना खाली कोसळून मृत्यू झाला. तेलंगणा राज्यातील म्हैसा येथील पारडी गावात ही घटना घडली आहे. हा तरुण लग्नाच्या वरातीत आपल्या तालात मस्त होऊन नाचताना अचानक खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या तरुणाचा ह्रदयविकाराचा झटका मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. तसेच या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. मध्यंतरी मध्य प्रदेशातील रिवा येथे एका लग्नाच्या मिरवणुकीत वराचा मित्र नाचताना अचानक कोसळून त्याचा मृत्यू झाला होता.
सध्याच्या व्यस्त आणि धावत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही काळात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढले आहे. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, धूम्रपानामुळे तरुणांमध्ये देखील हृदयविकार वाढत आहे. यासाठी सकस आहार आणि व्यायाम याद्वारे आपण त्यावर मात करू शकतो.