पुण्यातील या भागात अट्टल गुन्हेगाराकडून तरुणावर गोळीबार
नवनियुक्त पोलीस आयुक्तांचे स्वागत गोळीबारने, व्हिडिओ व्हायरल
पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुण्यातील वारजे येथील रामनगरमधील वेताळबाबा चौकात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरले आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींनी पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांना सलामी दिल्याची चर्चा रंगली आहे. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
कार्तिक इंगवले असे गोळीबार केलेल्या आरोपीचं नाव आहे. कार्तिक इंगवलेने त्याच्या मित्राबरोबर मित्र वेताळ बाबा चौकामधून चालला होता. त्यावेळी कार्तिकने एकाकडे ५०० रूपये मागितले. पण त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने कार्तिक इंगवलेने त्याच्यावर गोळीबार केला. सुदैवाने त्याला गोळी लागली नाही. कार्तिकने दारू पिऊन नशेत असताना हा गोळीबार केला आहे.गोळीबार करून आरोपीने तिथून पळ काढला. इंगवले हा सराईत गुन्हेगार असून, नुकताच तो मोक्का कारवाईतून जेलमधून बाहेर आला आहे. त्यांनतर पुन्हा त्याने धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी योगेश चंद्रकांत डोळसे यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या गोळीबाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पोलीस दलात मोठा फेरबदल होऊन पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार घेत काही तास होत नाहीत तोवर गोळीबाराची घटना घडली आहे.त्यामुळे वाढती गुन्हेगारी हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान असणार आहे.