Latest Marathi News
Ganesh J GIF

रिल्ससाठी तरुणांची दुचाकीवर स्टंटबाजी बेतली महिलेच्या जीवावर

पुण्यातील महम्मदवाडीत भररस्त्यात मृत्यूचे तांडव, दोघ रिल्समेकर्स अटकेत

पुणे दि ८(प्रतिनिधी)-. रिल्स बनवण्याच्या नादात दोघा प्रसिद्ध टिक टॉक स्टारसनी मोहम्मद वाडीमध्ये एका दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला जबरदस्त धडक दिली, ही धडक इतकी भीषण होती की यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

तस्लिमा पठाण असं मृत महिलेचं नाव आहे. तर या प्रकरणी आयान शेख आणि झायद शेख या दोन तरूणांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आयान आणि झायद हे दोघेही सोशल मीडियावर रील्स बनवत असतात. आज पण दोघे रिल्ससाठी दुचाकीवर स्टंट करत होते. त्याचवेळी तस्लिमा पठाण या स्कुटीवरून घरी जात होत्या. आयान शेख हा दुचाकी चालवत रिल्स बनवण्यासाठी स्टंट करत होता. तर दुसऱ्या बाजूला झायद हा व्हिडिओ काढत होता. यावेळी आयानने तस्लिमा पठाण यांच्या दुचाकीला धडक दिली.या धडकेत पठाण या खाली पडल्या. यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या अपघाता नंतर दोघांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदवून अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

आज-काल रील्स बनवून त्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी चांगला पैसा कमवत आहे. अनेक जण अगदी टिक टोक स्टार्स होऊन आपला टेंबा देखील मिरवत असतात. पण त्यांचा स्टंट अनेकदा जीवघेणा ठरत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!