दारुवरुन दोन तरुणाची डाॅक्टरला मारहाण
डाॅक्टरला केलेली मारहाण सीसीटीव्हीत कैद, ठाण्यात बघा नक्की काय घडल
ठाणे दि! ८(प्रतिनिधी)- रंग खेळताना दुखापत झाल्याने ठाण्यात एक तरूण डाॅक्टरांकडे गेला होता. त्यावेळी डाॅक्टरांनी त्या तरुणाला “दारु प्यायला का”? असे विचारले. पण या विचारण्याचा राग आल्याने तरूणाने डाॅक्टरला बेदम मारहाण केली आहे.
नितीन प्रजापती असे मारहाण झालेल्या डॉक्टरांचं नाव आहे. तर प्रथमेश पाटील आणि नंदकुमार पाटील अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अंबिवली येथील अटाळी गावात काल रंगपंचमी खेळत असताना एका तरुणाला पायाला काच लागली. त्यावर उपचार करण्यासाठी तो डॉ. नितीन प्रजापती यांच्या गुरुकृपा क्लिनिकमध्ये गेला. त्याची अवस्था पाहून डॉक्टरने त्याला “दारु प्यायला का?” असे विचारले. दारु प्यायला विचारल्याने तरुण संतापला आणि तो डाॅक्टरबरोबर वाद घालू लागला.पण त्यानंतर तरुण आणि त्याच्या मित्राने डाॅक्टरांना बेदम मारहाण केली. ही घटना क्लीनिकच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.या प्रकरणी आरोपी तरुणांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“मारहाण करणाऱ्या तरुणांना अटक करा. अन्यथा आंबिवली परिसरातील क्लिनिक बंद ठेवण्याचा” डॉक्टर संघटनेनं इशारा दिला आहे. राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. हत्या, मारहाण अशा प्रकाराचे गुन्हे राज्यात वाढत चालले आहेत. मुख्यमंत्र्यांचा जिल्हात सुद्धा गुन्हेगारी वाढली आहे.