Just another WordPress site

कोचिंग क्लासमध्ये 6 वर्षांच्या चिमुरड्याला क्रूर मारहाण, व्हिडीओ व्हायरल..!

बिहार प्रतिनिधी – कोचिंग क्लासमध्ये सहा वर्षांच्या मुलाला अमानुष  मारहाणा करणाऱ्या शिक्षकाला अखेर अटक करण्यात आली आहे. शिक्षकानं विद्यार्थ्याला केलेली मारहाण एकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली होती. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओही व्हायरल  झाला होता. अखेर पोलिसांनी या कोचिंक क्लास शिक्षकाला हुडकून काढत त्याला गजाआड केलाय. या घटनेनंतर एकच संताप व्यक्त केला जात होता. या शिक्षकाने सहा वर्षांच्या मुलाला आधी काठीने त्याच्या पार्श्वभागावर जबर फटके हाणले होते. त्यानं हा विद्यार्थी प्रचंड कळवळला होता. या विद्यार्थ्याचा आक्रोश काळीज चिरणारा होता. पण त्यानेही या शिक्षकाला पाझर फुटला नाही. उलट त्यानं यानंतर विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली होती. त्याच्या पाठीतही हाताने जोरदार प्रहार केले होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोचिंग क्लासमधून या शिक्षकाचं निलंबन करण्यात आलं होतं.

नेमकी घटना कुठली ?
GIF Advt

ही घटना बिहारमध्ये घडली होती. बिहारमधील पाटणामध्ये धनरुआ इथं चार दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली होती. जया कोचिंग क्लासेस काही विद्यार्थ्यांना आणि सैनिक शाळेत शिकणाऱ्यांना शिकवण्या दिल्या जात. तिनं शनिवारी छोटू नावाच्या शिक्षकानं या मुलाला बेदम मारहाण केलेली. विद्यार्थ्यावर या शिक्षकानं इतका राग काढला, की त्यात या विद्यार्थ्याला शिक्षकानं जबर मारहाण केली. या मारहाणीने वर्गातील सगळेच विद्यार्थी धास्तावले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या शिक्षकाचं नाव अमरकांत कुमार असल्याचं स्पष्ट झालंय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित कोचिंग सेंटरमधून या शिक्षकाला काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर गावातील लोकांनी या शिक्षकाला घेराव घालत त्याला चोप दिला होता. पण त्यातून या शिक्षक पळ काढण्यात यशस्वी झालेला. स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेची तक्रार पोलिसांतही दिली होती. पाटना पोलिसांनी या घटनेप्रकरणी गंभीर दखल घेत विशेष पथक या फरार शिक्षकाला शोधण्यासाठी तैनात केलं होतं. अखेर या शिक्षकाला आता अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून आता या शिक्षकाचा कसून तपास केला जातोय.

 

या घटनेचा व्हिडीओ खाली पाहा 

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!