Latest Marathi News
Ganesh J GIF

उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची शरद पवारांना माहितीच नव्हती?

मुंबई प्रतिनिधी – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे बहुमत गमावलेल्या उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सुप्रीम कोर्टाने रात्री ९ वाजता निकाल देत बहुमत चाचणीसाठी स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर अर्ध्या तासातच फेसबुक लाईव्ह करत उद्धव ठाकरेंनी राजीनाम्याची घोषणा केली. दरम्यान उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची माहिती महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांना नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची शरद पवारांना माहिती होती का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मला वाटत नाही. आम्ही टीव्हीवरच त्यांनी राजीनामा दिल्याचं पाहिलं. त्यांनी आधी सूतोवाच केलं होतं का याची माझ्याकडे माहिती नाही”.“मी त्यांच्यासोबतच टीव्ही पाहत होतो. उद्धव ठाकरेंचं भाषण पाहूनच ते राजीनामा देणार असल्याचं लक्षात आलं होतं,” असंही त्यांनी सांगितलं. सरकार पडणं आणि महाविकास आघाडी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!