Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून १२ जण ठार

आंबेडकर जयंती साजरी करुन परतताना भीषण अपघात, अनेक जखमी, बचावकार्य सुरू

पुणे दि १५(प्रतिनिधी)- जुन्या पुणे – मुंबई हायवेवर एक खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस दरीत कोसळल्याने १२ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २० ते ३० जण हे गंभीर जखमी झाले आहेत. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली. ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होती. पहाटे चार वाजताच्या सुमारास बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. चालकाचा ताबा सुटल्याने पुणे-मुंबई हायवेवर असलेल्या शिंगरोबा मंदिराच्या घाटात हा अपघात झाला. बस दरीत कोसळल्याने प्रवाशांची आरडाओरड सुरु झाली. रात्रीची वेळ असल्याने अनेक प्रवासी गाढ झोपेत होते. जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बसमध्ये बसमध्ये 6 मुली व 40 मुले असल्याची माहिती आहे. बसमध्ये ६ मुली व ४० मुले होती. सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त झांज पथक ऑर्डर मिळाल्याने पिंपरी-चिंचवडला गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर तेथून रात्री एकच्या ते मुंबईला परतत असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच, पोलीस प्रशासन आणि अग्निशम दलाचे जवान, हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या सर्वांनी रेस्क्यू ऑपरेशन युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पण मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

खाजगी बसमध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्यातील कार्यक्रम संपवून हे सर्वजण परत जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. या अपघातातील बस गोरेगावातील सुखकर्ता ट्रॅव्हल्सची व अपघातग्रस्त सतीश धुमाळ ढोल ताशा पथकातील कलाकार होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!