Latest Marathi News
Ganesh J GIF

सलमान खान या अभिनेत्रीसोबत रिलेशनमध्ये, करतोय डेट

दोघांच्या नात्याविषयी स्पष्टच बोलली अभिनेत्री, म्हणाली सात वर्षांपुर्वीच त्याने मला...

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी कि जान’ या चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे. या चित्रपटात सलमान खानचा साऊथ लूक पहायला मिळणार आहे. पण यावेळी सलमान खान पुन्हा एकदा एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत.

‘किसी का भाई किसी कि जान’ या चित्रपटात सलमान खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे यांची रोमॅंटिक केमिस्ट्री पहायला मिळणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी सलमान आणि पूजा एकत्र स्पॉट होत आहेत. यानंतर सलमान आणि पुजा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर पुजाने अखेर माैन सोडले आहे. एका मुलाखतीत त्याने तिच्या आणि सलमान खानच्या अफेअरच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली. या गॉसिप्समध्ये कितपत तथ्य आहे, असे विचारल्यावर ती म्हणाली, मी माझ्याबद्दलच्या या बातम्याही वाचल्या आहेत. पण तसं काही नाही. मी अविवाहित आहे मी स्वतःवर प्रेम करते. सध्या मी पूर्णपणे माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. मला शहरातून दुसऱ्या शहरात काम करायचे आहे. अशा अफवांवर मी काहीही बोलणार नाही. कारण त्यांना डोके व पाय नाहीत. इतकेच नव्हे तर सलमान खानसोबत काम करण्याचा अनुभव देखील तिने शेअर केला आहे. सलमानसोबत काम करतानाचा अनुभव शेअर करताना पूजा हेगडे म्हणाली कि, ‘सलमान खान यांनी २०१६ साली प्रदर्शित झालेल्या माझ्या ‘मोहनजोदड़ो’ चित्रपटातील माझे काम पाहिले होते आणि त्यानंतर आपण लवकरच एकत्र काम करू असे म्हटले होते. त्यामुळे जेव्हा मला या चित्रपटाची ऑफर आली मी स्वत:ला अजिबातच रोखू शकली नाही. अशी कबुली पुजाने दिली आहे.

‘किसी का भाई किसी कि जान’ हा चित्रपट येत्या २१ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित चित्रपटात व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, शहनाज गिल, पलक तिवारी, विजेंदर सिंग, राघव जुयाल, जस्सी गिल, भूमिका चावला आणि सिद्धार्थ निगम यांच्याही भूमिका आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!