Just another WordPress site

विषारी दारू पिऊन 31 जणांचा मृत्यू…या घटनेने गुजरात हादरले…बघा नेमक तिथ काय घडल..?

गुजरात – बोटाड जिल्ह्यातील रोजिद गावात कथितरित्या बनावट दारू प्यायल्याने किमान 31 लोकांचा मृत्यू झाला. तर 20 जण गंभीर आजारी पडले आहेत. त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी दिली त्यामध्ये काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणावरून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. गुजरात दहशतवादविरोधी पथक आणि अहमदाबाद क्राइम ब्रँच अशा दोन तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. गुजरातचे पोलिस महासंचालक आशिष भाटिया यांनी दिलेली माहिती अशी आहे, सकाळी दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर उपचारादरम्यान आणखी तीन जणांचा मृत्यू झाला. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. तसेच ज्याचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आला आहे. डॉक्टरांनी रिपोर्ट जाहीर केल्यानंतर नेमका कशामुळे मृत्यू झाला आहे, हे स्पष्ट होईल.

GIF Advt

बोटाड जिल्ह्यातील पाच आणि अहमदाबाद जिल्ह्यातील धंधुका तालुक्यातील दोन गावातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. किमान 20 बाधित रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यापैकी बहुतेकांना भावनगर येथील सर तख्तसिंहजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे असल्याची माहिती बोटाडचे पोलिस अधीक्षक करणराज वाघेला यांनी दिली.

पोलीस खुनाचा आरोपही जोडण्याची शक्यता

गरज पडल्यास पोलीस खुनाचा आरोपही जोडण्याची शक्यता आहे. गुजरात एटीएस सोबतच अहमदाबाद क्राइम ब्रँच देखील तपासात सहभागी झाली आहे. काही गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णाच्या पत्नीने पत्रकारांना माहिती दिली आहे. रविवारी रात्री रोजीद गावात दारू प्यायल्यानंतर त्यांच्या पतीची प्रकृती बिघडली. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

15 जणांची तब्येत अचानक बिघडली

रविवारी एकाकडून दारु विकत घेतल्यानंतर अचानक पंधरा जणांची तब्येत बिघडली आहे. पोलिस महानिरीक्षक अशोक कुमार यादव यांनी सायंकाळी बोताड सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. या घटनेच्या तपासासाठी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!