Latest Marathi News
Ganesh J GIF

४ उमेदवारांची ऐनवेळी माघार; महायुतीचे ६ दिग्गज बिनविरोध!

महाराष्ट्राच्या राजकारणातून विधान परिषद निवडणुकीबाबत अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीने मोठी बाजी मारली असून, तगडे राजकीय वलय असलेले महायुतीचे ६ उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे, उर्वरित ११ मतदारसंघांमध्ये मात्र काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभरात अनेक नाट्यमय घडामोडी आणि हायव्होल्टेज ड्रामा रंगला.

हे ६ दिग्गज ‘बिनविरोध’! फक्त अधिकृत घोषणेची औपचारिकता

सर्वच जागा बिनविरोध करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. त्यात त्यांना पूर्ण यश आले नसले, तरी ६ जागांवर त्यांनी विरोधकांना गारद केले आहे. खालील दिग्गज उमेदवारांसमोर आता लढायला कोणीही उरलेले नाही

अनिकेत तटकरे – (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) – राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र
विक्रम काकडे – (पुणे) – माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र, राष्ट्रवादी (अजित पवार गट).
दुष्यंत सतीश चतुर्वेदी – (यवतमाळ) – शिवसेना (शिंदे गट).
रवींद्र फाटक – (ठाणे) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक
अरुण लखानी – (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली) – भाजपचे जुनेजाणते नेते
प्राजक्त तनपुरे – (अहिल्यानगर) – भाजप उमेदवार

अहिल्यानगरमध्ये शेवटच्या मिनिटाला नाट्यमय घडामोडी!

अहिल्यानगरमध्ये भाजपचे प्राजक्त तनपुरे यांच्या विजयाचा मार्ग सोपा नव्हता. येथे अजित पवार गटाचे नेते आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या अनुमोदकाने दुपारी पानसरे यांची स्वाक्षरी असलेला माघारीचा अर्ज दाखल केला. मात्र, “त्या अर्जावर माझी सहीच नाही!” असा खळबळजनक आक्षेप स्वतः पानसरे यांनी घेतला. यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. शेवटी भाजप नेत्यांनी तातडीने मध्यस्थी करत पानसरे यांची मनधरणी केली. त्यानंतर पानसरे यांनी आपला आक्षेप मागे घेतल्याने त्यांचा माघारीचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला आणि तनपुरे बिनविरोध निवडून आले.

महाविकास आघाडीवर नामुष्की! ४ ठिकाणी उमेदवारांची ऐनवेळी माघार

या निवडणुकीत महाविकास आघाडीला (मविआ) एकामागून एक तब्बल चार मोठे धक्के बसले आहेत. शेवटच्या क्षणी मविआच्या अधिकृत उमेदवारांनीच माघार घेतल्याने आघाडीवर मोठी नामुष्की ओढवली आहे:काँग्रेसचे राज्य सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी पक्षनेत्यांशी कोणतीही चर्चा न करता बुधवारी अचानक आपला अर्ज मागे घेतला. मविआचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड यांनी अंतिम दिवशी माघार घेतली. यामुळे या निवडणुकीतून काँग्रेसचे ‘हात’ हे चिन्हच गायब झाले आहे.काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास सुमठाणकर यांनीही अखेरच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली.उद्धवसेनेच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!