
मुंबई दि ६(प्रतिनिधी) – राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन महिन्याभरपेक्षा अधिक काळ लोटला आहे. पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वारंवार दिल्लीचा दाैरा करत आहेत. पण सत्ता परिवर्तन झाले असले तरीही महाविकास आघाडीच्या नेत्यांना सरकारी बंगल्याचा मोह सोडवेना झाला आहे. उदय सामंत, संदीपान भुमरे आणि दादा भुसे या शिंदे गटातील नेत्यांच्या बंगल्यावर तर बैठका, पत्रकार परिषदा देखील सुरू आहेत.
एकून ४० बंगल्यांपैकी फक्त १८ बंगले रिकामे झाले आहेत. १३ माजी मंत्री आणि एका माजी अधिकाऱ्यानी अद्याप बंगले सोडलेले नाहीत. राज्य मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांसाठी मंत्रालय परिसरात मलबार हिल आणि आमदार निवासातल्या बंगल्यांमध्ये राहायची व्यवस्था केली जाते. रिक्त न झालेल्या बंगल्यांमध्ये शिंदे गटातले उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे या माजी मंत्र्यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनीही अद्याप बंगले सोडलेले नाहीत. आव्हाडांनी ठाकरे सरकार पडल्यानंतर शासकीय निवासस्थानी सगळ्या कामगारांचे आभार मानत निरोप समारंभही आयोजित केला होता.मात्र अधिकृतरित्या त्यांनी अजूनही आपला बंगला सोडलेला नाही.जोवर नवीन मंत्रिमंडळ स्थापन होत नाही तोवर हे नेते बंगले सोडण्याची शक्याता कमीच आहे.
बंगला सोडलेले मंत्री
उद्धव ठाकरे
आदित्य ठाकरे
यशोमती ठाकूर
सुनील केदार
बाळासाहेब थोरात
राजेंद्र शिंगणे
राजेश टोपे
अनिल देशमुख
नवाब मलिक
सुभाष देसाई
नितीन राऊत
अस्लम शेख
दिलीप वळसे पाटील
के.सी. पडवी
अमित देशमुख
वर्षा गायकवाड
अनिल परब
संजय राठोड
बंगला न सोडलेले मंत्री
धनंजय मुंडे
छगन भुजबळ
जयंत पाटील
अशोक चव्हाण
जितेंद्र आव्हाड
दादाजी भुसे
विजय वडेट्टीवार
उदय सामंत
हसन मुश्रीफ
गुलाबराव पाटील
संदिपान भुमरे
श्यामराव पाटील
नाना पटोले
सीताराम कुंटे