Just another WordPress site

‘बायको सर्वांसमोर झाडूने मारते’

बदनामीला घाबरत पतीने उचलल टोकाचं पाऊल

अहमदाबाद दि ६ (प्रतिनिधी)- गुजरातमध्ये नात्याला काळीमा फाडणारी घटना समोर आली आहे. पत्नी अत्याचार विरोधी संघटना स्थापन करून त्रस्त पतींना मदत करणाऱ्या दशरथ देवडा यांचे भाचे किरीट देवडा यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी किरीट यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

GIF Advt

किरीट यांनी १ जुलैला आत्महत्या केली. पोलीसांनी तपास केल्यानंतर त्यांच्या खिशात एक फोन सापडला. त्यात एक व्हिडीओ आढळला. यामध्ये पत्नी खोट्या प्रकरणांमध्ये कुटुंबाला फसवण्याची धमकी देते. मारहाण करते. झाडूनं मारते. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचं किरीट म्हणत आहेत. डिसेंबर २०१६ मध्ये किरीट यांचा विवाह अहमदाबादच्याच जीवराज पार्कमध्ये राहणाऱ्या मंजू राठोडशी झाला. त्यांना एक मुलगीदेखील आहे.
मंजू नेहमी किरीट यांच्या आई, वडिलांशी वाद घालायची. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी द्यायची. किरीट यांनी आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी मंजूनं किरीट यांना केर काढण्यावरुन वाद झाल्यानंतर सगळ्यांसमोर झाडूने मारहाण केली होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.

पोलिसांना किरीट यांच्या खिशात मोबाईल आढळून आला. त्यात एक व्हिडीओ होता. मी आयुष्याला कंटाळलो आहे. त्यामुळे आत्महत्या करत आहे. यासाठी माझी पत्नी जबाबदार आहे. यानंतर पोलिसांनी मंजूविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!