या अभिनेत्रीचा निर्माता मॅनेजरवर लैंगिक छळाचा आरोप
निर्माते मोदींनी आरोप फेटाळले, अभिनेत्री थेट व्हिडीओच करत म्हणाली सत्य लवकरच...
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- मनोरंजक विश्वात अनेकदा लैगिंक शोषनाचे आरोप होत आले आहेत. आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम जेनिफर मेस्त्री बंसीवालनं काल मालिकेच्या निर्मात्यांसह, प्रोजेक्ट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरने लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यावर निर्माते निर्माते असित कुमार मोदींनी सर्व आरोप फेटाळले होते. पण आता जेनिफर मेस्त्री बन्सीवालने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. लवकरच जगासमोर सत्य येईल असं म्हणत व्हिडीओ शेअर केला आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये रोशन सोधीची भूमिका साकारून अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या जेनिफर मेस्त्री बन्सीवालने अलीकडेच शोच्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्यावर निर्माते असित कुमार मोदींनी अभिनेत्रीने केलेले सर्व आरोप फेटाळत हे सर्व आरोप खोटे असल्याची माहिती आहे. जेनिफर निर्मात्यांची प्रतिमा बदनाम मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचं असित कुमार यांनी सांगितलं. सोबतच, जेनिफरने शो सोडला नसून तिला शोमधून बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले होते. पण त्यावर जेनिफिरने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिने आणखी आरोप केले आहेत. जेनिफरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या प्रकरणाचा व्हिडिओ आधीच पोस्ट केला आहे. ज्यात तिने केलेले आरोप खोटे ठरवणाऱ्यांना कवितेच्या शैलीत सडेतोड उत्तर दिले आहे. जेनिफर म्हणाली, ‘माझ्या मौनाला कमकुवतपणा समजू नका, मी गप्प बसले कारण माझ्याकडे शिष्टाचार आहे. सत्य काय ते देव साक्षी आहे, लक्षात ठेवा त्याच्या घरात तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही. रोशन सोधीने या उत्तरासोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सत्य लवकरच सर्वांसमोर येईल, न्याय मिळेल’. असा विश्वास व्यक्त केला आहे. तिची ही पोस्ट पाहून तिच्या अनेक चाहत्यांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. तिच्या या पोस्टला समर्थन करत युजर्स म्हणतात, ‘तु फक्त लढ, आम्ही तुझ्यासोबत आहोत.’ तर आणखी युजर म्हणतो, ‘न्यायासाठी लढ..मागे हटू नकोस.’ असा पाठिंबा दर्शवला आहे.
जेनिफर मेस्त्रीने एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत, मालिकेच्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. ती इतकी वर्षे या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे कारण तिला तिचे काम गमवायचे नव्हते. पण मालिकेच्या प्रोजेक्ट मॅनेजरने ती शोमध्ये परतण्यासाठी ब्लॅकमेल करत असल्याचा दावा केला आहे.