Latest Marathi News
Ganesh J GIF

क्रिकेटर ऋतुराज गायकवाड लवकरच अडकणार लग्नबंधनात

जवळच्या मैत्रीणीसोबत घेणार जूनमध्ये सात फेरे, पहा कोण आहे ऋतुराजची होणारी पत्नी?

पुणे दि २८(प्रतिनिधी)- चेन्नईचा स्टार फलंदाज सलामीवीर रुतुराज गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या जूनमध्ये ऋतुराज गायकवाड लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे. गायकवाडच्या भावी पत्नीचे नाव उत्कर्षा पवार आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी गायकवाडचा भारतीय संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. पण ऋतुराजने लग्नामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमधून माघार घेतली आहे. त्याच्याजागी यशस्वी जायस्वाल याला स्थान देण्यात आले आहे. उत्कर्षा पवार आणि ऋतुराज गायकवाड दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या वर्षी उत्कर्षा एका जिम सेशनमध्ये ऋतुराजसोबत दिसली होती. उत्कर्षा सोशल मीडियावर सक्रीय नाही. ऋतुराज गायकवाडसोबत उत्कर्षाचा एकही फोटो सोशल मीडियावर नाही. त्यांनी आपले नाते गुपीत ठेवले होते. दोघांच्या नात्याबद्दल कोणालाही जास्त कल्पना नव्हती. आता जून महिन्यात दोघेही लग्न करणार आहेत. दरम्यान इतर क्रिकेटपटूंप्रमाणेच ऋतुराज गायकवाडचेही नाव अभिनेत्री सायली संजीवसोबत जोडले गेले होते. मात्र इतर क्रिकेटपटूंप्रमाणे तीही अखेर अफवा ठरली.


उत्कर्षा पवार ही एक क्रिकेटपटू आहे. उत्कर्षाचा जन्म १३ ऑक्टोबर १९९८ रोजी झाला. तिचं बालपण पुण्यात गेलं आहे. ती २५ वर्षांची आहे. उत्कर्षा ही गायकवाडची मैत्रीण असल्याचे समजते. याशिवाय दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत असल्याचेही समजते. मात्र, त्यानंतरही दोघांबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!