Latest Marathi News
Ganesh J GIF

चाहत्याने या अभिनेत्रीला विचारले तुझी जात कोणती?

अभिनेत्रीच्या उत्तराने चाहत्याची बोलती बंद, एक शब्दही न बोलता दिला मोठा संदेश बघा..

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- जात ही विचारसरणी काही केल्या आपल्या समाजातून जाताना दिसत नाही. त्यात चित्रपट सृष्टीत काम करणारे कलाकार कोणत्या जातीचे असतात हे त्यांच्या चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. याचा नुकताच एका अभिनेत्रीला अनुभव आला आहे. चाहत्याने तिला जात विचारली असता तिने भन्नाट उत्तर दिले आहे.
अभिनेत्री अदिती द्रविड हिने आतापर्यंत विविध मालिकांमधून तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

अदिती सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी ती सोशल मीडियावरून शेअर करत असते. नुकतेच तिने चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेतलं. या सेशनदरम्यान एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला की, “तुझी जात काय आहे?” यावर अदितीने कसलंही उत्तर न देता फक्त एक स्मितहास्याचा इमोजी शेअर केला. एक स्माईली इमोजी शेअर करून तिने तिच्या जातीबद्दल प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याची बोलती बंद करत आपली जात फक्त आनंदी राहणे असल्याचा संदेश दिला आहे. तिच्या या उत्तराचे सोशल मिडीयावर काैतुक होत आहे.

विविध मालिका, चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची दाद मिळवलेली अभिनेत्री अदिती द्रविडने नुकताच ‘द ड्रेसवाली.को’ नावाने कपड्याचा व्यवसाय सुरु केला आहे. सध्या अदिती अनेक प्रोजेक्टमध्ये काम करत आहेत. ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार हे पाहणे महत्वाचे आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!