Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रेम प्रकरणातील ‘या’ कारणामुळे तरुणाची आत्महत्या

लग्नानंतर आठ महिन्यातच तरुणाचे उचलले टोकाचे पाऊल

पुणे दि १० (प्रतिनिधी)- पुण्यात नुकतेच लग्न झालेल्या तरुणाने प्रेम प्रकरणातून स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हडपसर परिसरातील भागीरथीनगरमध्ये ही घटना घडली. विशेष म्हणजे डिसेंबर मध्ये या तरुणाचे लग्न झाले होते. विशाल राजेंद्र तोडकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशालचा कपड्यांचा व्यवसाय होता. डिसेंबरमध्ये त्याचे लग्न झाले होते. पण त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या कारणावरुन मागील काही दिवसांपासून त्याचे घरात वाद सुरु होते. यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती. पत्नी माहेरी गेल्याने तो नैराश्यात होता. त्यातूनच त्याने रविवारी रात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. सकाळ होऊनही तो खाली न आल्याने कुटुंबीयांनी घरी येऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला.पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला असून विशालने गावठी पिस्तूल कोणाकडून आणली. तसेच यामागे आणखी कोणती शक्यता आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!