श्रीकांत शिंदे आगामी लोकसभा कमळ चिन्हावर लढणार?
कल्याण लोकसभेच्या वादावर पडदा टाकण्यासाठी नवी रणनिती?, भाजपामुळे एकनाथ शिंदेची गोची?
ठाणे दि १२(प्रतिनिधी)- कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजप-शिवसेना युतीत ठिणगी पडल्याचे चित्र समोर आले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या भाजपच्या बैठकीत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा निर्णय घेण्यात आला.भाजपच्या याच भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी थेट कल्याणच्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुहेरी कोंडी झाली आहे.
भाजपाने कल्याण आणि ठाणे लोकसभेच्या जागावर दावा केला आहे. कल्याणचा पुढील खासदार भाजप ठरवणार असा दावा भाजपा नेत्यांनी केल्या आहेत. भाजपकडून आव्हान दिले जात असल्याने श्रीकांत शिंदे यांची स्वतः पुढे येत आपल्याला कोणीही आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये, युतीसाठी वेळ पडल्यास आपण खासदारकीचाही राजीनामा देऊ अशी घोषणा करत आर पारच्या लढाईचे संकेत दिले होते. मानपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी शेखर बागडे यांच्यावरून सुरु झालेला वाद थेट युतीच्या बेबनावापर्यंत आला आहे. डोंबिवली हा आरएसएचा गड मानला जातो. त्यामुळे भाजपचा पगडा येथे जास्त आहे. संघटन पातळीवर देखील एकवाक्यता दिसून येते. रवींद्र चव्हाण हे भाजपकडे प्रभावी पर्याय आहेत. तसेच आरएसएसची यंत्रणा भाजपसाठी जमेची बाजू असून हा वाद असाच कायम राहिल्यास शिंदेंना डोकेदुखी ठरू शकते. तसेच कल्याण लोकसभेत भाजपचे तीन आमदार आहेत. एक राष्ट्रवादीचा एक मनसेचा तर एक आमदार शिंदे गटाचा आहे. त्यामुळे भाजपाची नाराजी शिंदेना अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत तणाव असल्याचा दावा भाजप व शिंदे गटाकडून सातत्यानं केला जात होता. महाविकास आघाडीत समन्वय नसल्याच्या बोललं जात होते. पण आता थेट मुख्यमंत्री स्वतः च्या मुलाचा मतदारसंघ मित्रपक्षाकडून म्हणजे भाजपाकडून मिळवू शकतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
श्रीकांत शिंदे हे सध्या कल्याण लोकसभेचे खासदार आहेत, मात्र त्या जागेवर भाजपची एक वर्षापासून नजर आहे. भाजपनं ही जागा नको इतकी प्रतिष्ठेची केली आहे. याचा अंदाज आल्यानंच श्रीकांत शिंदे यांनी व्यथित होऊन खासदारकीचा राजीनामा देण्याचं वक्तव्य केले. श्रीकांत शिंदे यांना टार्गेट करून भाजपनं उर्वरित दहा खासदारांना योग्य संदेश दिला आहे. या सर्वांनी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी अन्यथा राजकीय संन्यासाला सामोरे जावं अशी अट उद्या भाजप घालेल, असा दावा राष्ट्रवादीने केला आहे.