राज्यात २०२४ नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत?
शिंदे गटातील आमदाराचे वक्तव्य, अकार्यक्षम मंत्र्यांना वगळण्याची मागणी, बघा काय केला दावा
अमरावती दि ३०(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन १ वर्ष होत पूर्ण झाले आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु, लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता आहे. त्यातच शिंदे गट समर्थन आमदारांनी धक्कादायक वक्तव्य केल्याने चर्चा होत आहे.
आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले “मंत्रिमंडळ विस्तार लवकर करून मोकळं केलं पाहिजे. नाही तर सांगून द्या २०२४ मध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल म्हणून. असे म्हणत असताना आगामी २०२४ च्या निवडणूकीनंतर शिंदे नाहीतर आपण मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले “एका-एका मंत्र्यांकडे 8 खाते आहेत. कामे होत नाही. फाईल पडल्या आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील, नाही तर मी राहील असे कडू म्हणाले आहेत. तसेच जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं. यावर बच्चू कडू यांनी मिश्किल प्रतिक्रिया देत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची घाई मीडियाला जास्त झालेली दिसते. तुम्हाला कुणी सांगितले? असा सवाल त्यांनी माध्यमांना विचारला आहे. विस्तार हा महत्त्वाचा नाही. आमचे काम होत आहे हे आमच्यासाठी चांगले आहे, कुणाला मंत्रिमंडळातून डच्चू मिळेल असं वाटत नाही. मात्र, ज्याची कामगिरी खराब असेल त्याला मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, असेही कडू म्हणाले आहेत.
१५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन नाही. तसेच तिरंगा हा राष्ट्रध्वज नाही. असे वक्तव्यं जर इतर धर्मीयांनी केलं असतं. तर आपण त्याला देशद्रोही म्हटलं असतं. संभाजी भिडे यांना आम्ही जेष्ठ आणि श्रेष्ठ मानत होतो. मात्र ते श्रेष्ठ नाही हे त्यांनी त्यांच्या वक्तव्यतून दाखवून दिले. अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर दिली.