पुण्यातील या काॅलेजमध्ये मुलींच्या वाॅशरुममध्ये सीसीटीव्हीत कॅमेरे?
ख्रिश्चन धर्माची प्रार्थनेची सक्ती केल्यामुळे प्राचार्याला मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, प्रकरण काय?
पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून महाविद्यालयातील प्राचार्यांना मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मारहाणीमागचे कारण समोर आले आहे.
पुणे जिल्ह्यातील तळेगाव आंबी येथे डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेचे महाविद्यालय आणि विद्यालय आहे. या ठिकाणी ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्यामुळे महाविद्यालयातील प्राचार्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे का लावले? असा सवाल करत प्राचार्य अलेक्झांडर रीड यांना मारहाण करण्यात आली आहे. आता हा प्रकार थांबवला जावा आणि प्राचार्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. “इथे मुलांना संस्कार मिळतील या हेतून आम्ही मुलांना शाळेत घालतो पण या ठिकाणी जर फक्त ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना घेतल्या जात असतील तर हे चुकीचे आहे. आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तसेच तहसीलदाराने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. लेडीज टाॅयलेट टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याच्या प्रकरणाचा अहवाल सादर केला जाणार आहे. दरम्यान काॅलेज प्रशासनाने मात्र अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.