शिंदे फडणवीस सरकारमधील या मंत्र्यांची होणार हकालपट्टी?
शिंदे गटातील मंत्र्यांचा राजीनामा देण्यास नकार, विस्तार रखडला, शिंदेची डोकेदुखी वाढली?
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- अजित पवार भाजपाबरोबर सत्तेत सामील होत आठवडा झाला आहे. पण पवार यांच्या सत्तेत सामील होण्याच्या निर्णयानंतर शिंदे गट आणि भाजपात नाराजीचे वातावरण आहे. शिंदे गट आणि भाजपातील काही जणांची मंत्री होण्याची इच्छा अजित पवारांमुळे अपूर्ण राहणार आहे.त्यातच आता संभाव्य मंत्रिमंडळाच्या चर्चा सुरु असताना भाजपातील काहीजण राजीनामा देण्याची शक्यता आहे.
भाजपाचे दोन ते तीन मंत्री राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाच्याही काही मंत्र्यांना राजीनामा देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पण शिंदे गटाच्या आमदारांनी त्याला नकार दिल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. शिंदे गटातील 2 ते ३ आमदार बदली करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. असे असले तरीही शिंदे गटातील हे मंत्री राजीनामा देण्यासाठी तयार नाहीत, त्यामुळे शिंदेची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान आपल्या मंत्री पदाच्या कार्यकाळात प्रभावी काम न करु शकलेल्या मंत्र्यांना राजीनामा देऊन त्याजागी नवीन आमदारांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण भाजपा आपल्या मंत्र्याच्या कारभाराचे मूल्यांकन करत असते. त्यामुळे प्रभावी कामगिरी न करणारे ते आमदार कोण याची माहीत विस्ताराच्या वेळी होणार आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप करू नये. त्यामुळे पवार गटाच्या मंत्र्यांना अजून विभागाचे वाटप रखडले आहे.
अजित पवार यांच्या गटाने भाजप-शिंदे सरकारसोबत एकी केल्यानंतर पवार गटातील आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र, वर्ष होत आले तरी शिंदे-फडणवीस सरकारमधील उर्वरित आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली नसल्यामुळे त्यातून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी आता उर्वरित मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजप व शिवसेनेच्याच आमदारांना शपथ दिली जाणार असल्याची चर्चा होत आहे.