‘गुपचूप भेटा किंवा सर्वांपुढे भेटा, पण एवढी तर मला आयडिया..’
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीची नेमकी प्रतिक्रिया
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात गुप्त भेट झाली. या भेटीमुळं पुन्हा राजकीय चर्चांना उधाणं आलं आहे. अनेकजण उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण आता दोघांची गुप्त भेट झाली त्यामुळे या चर्चा अधिकच जोरात सुरू आहेत. अमृता फडणवीस यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “एवढी तर मला आयडिया नाही कोण गुपचूप भेटतं. पण भेटणं कधीही चांगलं, गुपचूप भेटा किंवा सर्वांपुढे भेटा, प्रेमानं भेटा ही सगळ्यात चांगली गोष्ट आणि भेटत राहा” असे त्या म्हणाल्या आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी अमृता फडणवीसांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर टीकाही केल्या आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर अमृता फडणवीसांनी पवारांवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. दरम्यान ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती? या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती आणि पंचशील रिअॅलिटीचे प्रमुख अतुल चोरडिया यांच्या कोरेगाव पार्क इथल्या बंगल्यावर शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाल्याने महायुती बरोबरच महाविकास आघाडीतही संभम्र निर्माण झाला आहे.
अमृता फडणवीस यांची एक बिनधास्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख आहे, त्या एक गायिका देखील आहेत, पती देवेंद्र फडणवीस राजकारणात असल्याने त्या नेहमी आपल्या बिनधास्त वक्तव्याने चर्चेत असतात. पण अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर त्या साैम्य प्रतिक्रिया दिली आहे.