Latest Marathi News
Ganesh J GIF

ती डेडलाईन हुकल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज?

शरद पवार अजित पवार यांच्या भेटीमागील कारण समोर? राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?, भेटीतील तपशील समोर?

पुणे दि १३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त भेट झाल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधान आले आहे. पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी अजित पवार यांनी शरद पवारांची गुप्त पद्धतीने भेट घेतली. अडीच तास चाललेल्या या भेटीत सध्याच्या राजकीय घडामोडींवर सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे. पण त्याचबरोबर आगामी काळात राजकीय भुकंपाची शक्यता व्यक्त होत आहे. त्यात आता भेटीतील चर्चेचा तपशील समोर आली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकारणात भूकंप आणणारी शंका उपस्थित केली जात आहे. चव्हाण यांनी दोन पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हणाली की, “शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार गटाने जरी भेट झाल्याचं नाकारलं असलं तरी अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे माध्यमांकडे याचे व्हिडीओ आहेत. अजित पवारांना १० तारखेच्या सुमारास किंवा कधीतरी मुख्यमंत्री करतो, असा शब्द दिला होता. तो शब्द जर पूर्ण झाला नाही, तर त्यांचा पवित्रा काय असणार आहे? यासंदर्भात चर्चा झाल्याचं नाकारता येऊ शकत नाही”, अशी शंका पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली आहे. पण त्याचवेळी दोघांपैकी एकाने समोर येऊन स्पष्ट करायला हवं की या भेटी नेमक्या कशासाठी झाल्या? त्यामुळे कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर होईल, असेही चव्हाण म्हणाले आहेत. अजित पवार ११ आॅगस्टला मुख्यमंत्री होणार, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण ती डेडलाईन चुकल्यामुळे संभम्र निर्माण झाला आहे. त्यातच अजून पालकमंत्री न नेमल्यामुळे अस्वस्थता वाढली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने ज्याप्रमाणे संघर्ष झाला, तसा संघर्ष राष्ट्रवादीत न झाल्यामुळे महाविकास आघाडीत अविशवासाचे वातावरण आहे. त्यातच निवडणूक आयोगाकडे दोघांनीही पक्षात फूट पडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संभम्र आणखी वाढला आहे. त्यामुळे आणखी मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण भाजपाने राज्यात लोकसभेला जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी शरद पवार यांच्याशी जुळवून घ्यायला ते तयार आहेत.

राष्ट्रवादीतील घडामोडीमुळे काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये अविश्वास निर्माण होऊ लागला आहे. शरद पवार यांनी ऐनवेळी काही वेगळा निर्णय घेतला तर होणारी राजकीय अडचण टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी आपली यंत्रणा उभी करण्यास सुरूवात केली आहे. कारण राज्यात २०१९ पासून राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. कोण कधी कोणत्या पक्षाबरोबर जाईल याची खात्री देण सध्यातरी कठीण झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!