पत्नी आणि प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून वकीलाची आत्महत्या
प्रेयसीच्या घरी केली आत्महत्या, सुसाईड नोट लिहित संपवले जीवन, आई आणि मुलाची मागितली माफी
जयपूर दि १३(प्रतिनिधी)- पत्नी आणि प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे फेसबुकवर पोस्ट करत त्याने आपली आई, मुलगा, प्रेयसीची माफीही मागितली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
भरत मिश्रा असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येपुर्वी फेसबुकवर भलीमोठी पोस्ट करत भरतने आत्महत्या केली आहे. त्याने लिहिले आहे की, पत्नीने माझी सर्व ठिकाणी बदनामी केली. मित्रांसोबत माझा वाद झाला. मला तोंड दाखवायला जागा राहिली नाही, गेल्या महिन्याच्या ९ तारखेला माझी पत्नी प्रेयसीच्या घरी गेली. ती प्रेयसीला वाईटसाईट बोलली. पत्नीचं ऐकून प्रेयसीदेखील मला त्रास देऊ लागली. आमच्यातला वाद वाढत गेला, असे त्याने म्हटले आहे. असल्याचं भरतनं फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. भरतनं आत्महत्या केली त्यावेळी त्याची प्रेयसी तिथेच होती. तिच्याच उपस्थितीत त्यानं स्वत:वर गोळी झाडली. पण तिनं याची माहिती पोलिसांना दिली नाही. पोलिसांना घटनेची माहिती उशीरा मिळाली. पोलिसांना घटनास्थळी रिव्हॉल्वर आणि मोबाईल मिळून आला. त्याआधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण महत्वाचे म्हणजे मिश्राच्या कुटुंबियांनी प्रेयसी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
भरतने त्याच्या प्रेयसीसाठी नोटमध्ये बरेच काही लिहिले आहे. तुझ्या फोनमध्ये माझा फोटो आहे. तो फ्रेम करुन माझ्या पार्थिवावर ठेव. मृतदेहाला अग्नी देण्याआधी पत्नी म्हणून तु सर्व विधी पूर्ण कर. तुझ्या पोटात असलेल्या माझ्या बाळाला जन्म दे, अशा इच्छा त्याने नोटमध्ये व्यक्त केली आहे.