Latest Marathi News
Ganesh J GIF

‘हा’ आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?

एकनाथ शिंदे ठाकरेंना आणखी एक धक्का देणार

मुंबई दि १९ (प्रतिनिधी)- अभूतपूर्व राजकीय घडामोडीनंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर कोकणातील राजकारण बदलले आहे. शिंदेच्या बंडखोरीनंतर कोकणात केवळ ३ आमदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले आहेत. सध्या उद्धव ठाकरे यांना राज्यभरातून केवळ १५ आमदारांचं पाठबळ आहे. पण लवकरच कोकणातील एक आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

कोकणात उद्धव ठाकरेंना भास्कर जाधव, राजन साळवी आणि वैभव नाईक तिघेही ‘मातोश्री’च्या जवळचे आहेत. मात्र या अधिवेशन काळात यातील एक आमदार ठाकरेंची साथ सोडणार आहे. कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी आमदार राजन साळवी अनुकूल आहेत मात्र खासदार विनायक राऊत हे प्रकल्पाविरोधात आहेत.याच मुद्दयावरून कोकणातील आमदार राजन साळवी शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आता जोर धरू लागली आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असणार आहे. या आमदाराने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक आमदारांची भूमिका महत्त्वाची असल्याचं म्हटले होते. यावेळी त्यांनी आमदार राजन साळवी यांचीही आपण लवकरच भेट घेऊन चर्चा करू असे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे शिंदे गटात जाणारे आमदार राजन साळवीच असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.


एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खरी शिवसेना कोणाची यावर न्यायालयात आणि निवडणूक आयोगाने या दोन्ही ठिकाणी लढा सुरू आहे. येत्या सोमवारी यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच एक आमदार साथ सोडणार या शक्यतेने उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!