Latest Marathi News
Ganesh J GIF

सिंहगड कॅम्पसमध्ये टोळक्यांची दहशत ; गप्पा मारत थांबलेल्याला तरुणांना डांबून ठेवून केली मारहाण

गप्पा मारत थांबलेल्याबद्दल वाद घालून तरुणांना टोळक्याने डांबून ठेवून लाकडी काठीने मारहाण करुन दहशत निर्माण केली. याप्रकरणी विशाल केशव भोकरे (वय २०) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी तेजराज दराडे, महेश कोल्हे, प्रितम बाबा कोयले, बल्ली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सिंहगड कॅम्पसमधील प्रितम बाबा कोयले यांच्या कार्यालयात व रोडवर २४ सप्टेबर रोजी मध्यरात्री दीड वाजता आणि पहाटे साडेचार वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र अमर ठाकरे, अभिषेक लांडे, सौरभ गायकवाड हे थांबले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना तुम्ही इथे का थांबता, निघा येथून असे म्हणून शिवीगाळ करुन दमदाटी करुन ते मारण्यासाठी अंगावर धावून येऊन वाद घातला. या गोष्टीचा राग मनात धरुन त्यानंतर त्याच दिवशी पहाटे साडेचार वाजता समोरील रस्त्यावर फिर्यादीचा मित्र अमर ठाकरे हा एकटा जात असताना त्यास नाना शिंदे व त्याचे मित्रांनी मारहाण करुन धमकी दिली.

सायंकाळी ५ वाजता फिर्यादी हे प्रितम बाबा कोयले यांच्या कार्यालयासमोरुन अमर ठाकरे याची औषधे घेऊन एकटे पायी जात होते. यावेळी आरोपींनी त्यांना पकडून ओढत प्रितम कोयले यांच्या कार्यालयात जबरदस्तीने नेऊन डांबले. त्यांना तेजराज दराडे याने लाकडी काठीने महेश कोल्हे व प्रितमबाबा कोयले यांनी लाथाबुक्क्यांनी फिर्यादीच्या तोंड, डोके, छाती, पाठीवर मारहाण करुन जखमी केले. त्यानंतर पुन्हा ओढत रस्त्यावर घेऊन गेले. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने जो आमच्या नादाला लागेल, त्याचे आम्ही असेच हाल करु, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!