
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ पोलीसांच्या हाती
हत्येवेळी ते सोळा काॅल कोणाला?, सीआयडीकडून तपासाला गती, यांची केली चाैकशी
बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. आता सीआयडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी एका वरिष्ठ नेत्याला तब्बल १६ वेळा आरोपीच्या मोबाईलमधून फोन करण्यात आले होता. त्याचबरोबर देशमुख यांच्या मारहाणीचे व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात राज्य सरकारच्या आदेश वरून सीआयडी चौकशी सुरू आहे. खंडणी प्रकरणात सीआयडी वाल्मिकी कराड यांची चौकशी सुरू केली आहे. पण चौकशी सुरू असतानाच वाल्मिकी कराड फरार झाला आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड यांची पत्नी अंजली कराड यांची सीआयडी कडून चौकशी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सीआयडीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी त्यांना मारहाण करत असतानाचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती आला आहे. आरोपी सुदर्शन घुले यांच्या मोबाईलमधील व्हिडिओ सीबीआयच्या ताब्यात आला आहे. हत्या करून फरार होताना गाडी सोडून फरार आरोपी निघून गेले, यावेळी पोलिसांनी स्कार्पिओ गाडी ताब्यात घेतली. त्यात दोन मोबाइल आढळून आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने तपासासाठी तीन पथक तयार केले आहेत. सीआयडीने अनेकांचे कॉल रेकॉर्ड काढण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय, वाल्मिक कराड यांचे दोन्ही अंगरक्षकांचे मोबाईल फोन फॉरेन्सीक तपासणीसाठी जप्त केले आहेत.
संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणातील काही आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. तामुळे राज्यभरात संतप्त वातावरण आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्व पक्षांचे नेते सहभागी झाले होते.