Latest Marathi News
Ganesh J GIF

पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यामुळे पत्नीची आत्महत्या

एक महिन्यापूर्वी झाला होता विवाह, नवदांपतत्याच्या मृत्यूने गाव हळहळला

सोलापूर – पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पत्नीने तिसऱ्याच दिवशीच ओढणीच्या साहाय्याने पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेत जीवन संपवल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. या घटनेची पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

अनिता निखिल घोंगडे असे मृत विवाहितेचे नाव आहे. सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील निखिल घोंगडे याचा ५ डिसेंबर २०२४ रोजी अनितासोबत थाटामाटात विवाह झाला होता. घरी मंगलकार्य झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र मंगळवार दि. ७ जानेवारी रोजी निखिल याचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे पत्नी अनिता हिला मानसिक धक्का बसला. निखिल याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री घोंगडे कुटुंबीयांसमवेत निखिलची पत्नी अनिता असे सर्वजण मिळून घरात झोपले होते. त्यानंतर गुरुवारी पहाटे अनिता हिने पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने घराच्या पाठीमागील पत्राशेडमधील लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. सकाळी अनिता दिसून न आल्याने नातेवाइक तिचा शोध घेत असताना तिने पत्रा शेडमध्ये गळफास घेतल्याचे दिसून आले. नातेवाइकांनी तिला खाली उतरून तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले. निखिल घोंगडे याला ६ जानेवारी रोजी त्याला डेंग्यूचा ताप आला म्हणून पुन्हा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केले होते. त्या ठिकाणी निमोनिया आणि रक्तात कावीळ झाल्याने दुर्देवी मृत्यू झाला.

निखिल घोंगडे यांच्या वयाच्या ६ व्या वर्षापासून दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे आई स्वाती दिगंबर घोंगडे यांनी स्वतःची एक किडनी त्याला देत जीवदान दिले होते. दरम्यान घोंगडे कुटुंबातील दोघांच्या मृत्यूमुळे अख्ख गाव हळहळ व्यक्त करीत होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!