Latest Marathi News
Ganesh J GIF

माझ्या पती देवाच्या लाडक्या बहिणी ते प्रगति व्हावी तुमची झकास

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची तुफान फटकेबाजी, उखाणा घेतल्यानंतर जोरदार दाद, एकदा पहाच

पुणे – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतीच पुण्याचे भाजपाचे माजी नगसेवक किरण दगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी घेतलेल्या उखाण्याची जोरदार चर्चा होत आहे.

अमृता फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेला केंद्रबिंदू ठेऊन मस्त उखाणा घेतला. त्या म्हणाल्या “आज माझ्या नणंदा दिसत आहेत खास, देवेंद्रजी तुमच्या पाठीशी आहेत, प्रगती व्हावी तुमची झक्कास.” यानंतर जोरदार असल्याचा कडकडाट झाला. महिलांना मनमोकळेपणे जगण्याचा आणि विरोधी विचारांनाही हास्याने सामोरे जाण्याचा सल्ला देत अमृता फडणवीस म्हणाल्या, आपल्याल जर छान, हेल्दी जगायचं असेल तर रोज हसायचं. कोणी काही टोला मारला, टोमणा लगावला तरी तरी तो ऐकायचा आणि सोडून देऊन हसायंच, मी तेच केलंय, माझ्या जीवनात मला जे ठीक वाटतं ते मी केलं, माझ्या मुलीसाठी पण पुढे मी एक वाट मोकळी करून शकेन असं वाटलं, ते मी केलं. माझ्ं लग्न झाल्यानंतरही मी गाणं सुरू ठेवणं असो, नाचणं असो, बँकिंग असो, मी ते सगळं चालू ठेवलं. कोणीही मला टोला मारला , टोमणे ऐकवले तर मी ते फक्त ऐकायचे, हसायचे आणि पुढे निघून जायचे, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी फडणवीस यांचा लोकप्रिय झालेला मी पुन्हा येईन च्या अंदाजात एक कोटी केली. त्या म्हणाल्या उशीरा येण्याबद्दल मी सॉरी तर म्हणणार नाही, मी बसं एढचं म्हणेन की ‘मी पुन्हा येईन’ असा नारा देत पुन्हा येईन तेव्हा लेट येणार नाही, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी हसतखेळत, मजेशीर अंदाजात भाषण केले.

राज्य सरकारच्या याच योजनेचा विविध नेत्यांकडूनही प्रसार सुरू असतो, उल्लेख होत असतो, अमृता फडणवीस यांनीही वेळोवेळी सरकारी योजनेचा प्रचार आणि प्रसार केल्याचं या आधीही दिसून आलं आहे. काल पुण्यातील कार्यक्रमातही त्यांनी याच योजनेचा उल्लेख करत उपस्थित महिलांसाठी, लाडक्या बहिणींचा खास उल्लेख केला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!