Latest Marathi News
Ganesh J GIF

दलित तरुणीच्या निर्घुण हत्येमुळे खासदारांना कोसळले रडू

पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर खासदारांना अश्रू अनावर, राजीनामा देण्याचा दिला इशारा

अयोध्या – अयोध्येत एका २२ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. बेपत्ता मुलीचा विवस्त्र मृतदेह शनिवारी सापडला, तिची निर्घृण हत्या करण्यात आली असून तिचे डोळे काढण्यात आले आहेत. तसेच तिच्या शरीरावर अनेक जखमा करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

या घटनेनंतर आता अयोध्येत राजकीय वातावरण गरम झाले आहे. पण यादरम्यान समाजवादी पक्षाचे फैजाबादचे खासदार अवधेश प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली, यात त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले. अवधेश प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना सरकार मुलीला न्याय देण्यास अपयशी ठरले आहे, असे म्हटले. ही घटना अत्यंत दु:खद आणि अमानुष असल्याची भावना व्यक्त केली. निर्भया घटनेपेक्षा ही घटना अधिक भीषण असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरही हा मुद्दा उपस्थित करणार आहे, असं अवधेश प्रसाद यांनी म्हटले आहे. प्रसाद यांच्या रडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मी हा मुद्दा पंतप्रधान मोदींसमोर कोणत्याही परिस्थितीत मांडणार आहे. जर न्याय मिळाला नाही तर मी राजीनामाही देईन. आमच्या मुलीची इज्जत वाचवण्यात आम्ही अपयशी ठरलो आहोत. इतिहास आमच्याबद्दल काय म्हणेल, तुम्हीच विचार करा, ही भारतातील सर्वात वेदनादायक घटना आहे,” असंही अवधेश प्रसाद म्हणाले आहेत. दरम्यान पत्रकार परिषदेत रडत असतानाचा त्यांचा रडण्याचा व्हिडिओ समोर आला. ज्यामध्ये त्यांना बोलता बोलता अश्रू अनावर झाले आणि रडू कोसळले. यावेळी त्यांचे सहकारी त्यांना सावरताना दिसत आहेत. तरुणीच्या हत्येनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी योग्य पद्धतीने शोध घेतला नाही असा दावा कुटुंबियांनी केला आहे.

 

मृत महिलेच्या कुटुंबियांनी सांगितले की ती महिला गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता होती. त्यानंतर त्यांनी शोध घेणे सुरू केले आणि शनिवारी सकाळी तिच्या मेव्हण्याला तिचा मृतदेह त्यांच्या गावापासून फक्त ५०० मीटर अंतरावर एका छोट्या कॅनलमध्ये आढळून आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!