
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी काढली छेड
महाराष्ट्रात चाललयं काय? मंत्र्याच्या मुलीच असुरक्षित, छेड काढत व्हिडिओही काढला
जळगाव – केंद्रीय राज्य मंत्री आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली आहे. काही टवाळखोर पोरांनी ही छेड काढण्यात आली आहे. संबंधित मुलांना अडविण्याचा प्रयत्न मुलीच्या सुरक्षारक्षकांनी केला असता संबंधित टवाळखोरांनी त्यांनाही धक्काबुक्की केली आहे.
मुलीची छेडछाड काढल्यानंतर रक्षा खडसे या थेट पोलिस ठाण्यात पोहोचल्या आहेत. काही टवाळखोर मुलांनी तिच्या मनाविरोधात फोटो काढले. छेडछाड करणाऱ्या चार मुलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीसोबतच इतरही मुलींची छेडछाड या मुलांनी केली असल्याचे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. ज्या मुलाने छेड काढली, त्याच्यावर अगोदरच चार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियूश मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील किरण माळी आणि सचिन पालवी अशी पाच आरोपींची नावे आहेत. त्यांचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच पाचही आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. मुक्ताईनगर येथे यात्रा महोत्सव सुरू आहे. या यात्रा महोत्सवात भाजपच्या मंत्र्यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसह गेली होती. यावेळी काही टवाळखोरांनी त्यांची छेड काढली. यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
माध्यमांशी बोलताना बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की आज एका मंत्र्याची खासदाराची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य मुलींचे काय याबाबत मी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली आहे. कायदे आहेत पण राज्य सरकारकडे मागणी करेल की अशा प्रवृत्तीच्या लोकांना पायबंद घालण्यासाठी कठोरात कठोर कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी केली आहे.