
लग्नात नवरीचा तो डान्स पाहून नवरदेव आणि पाहुणेही हैराण
व्हिडिओ जोरदार व्हायरल, नवरीने होणाऱ्या पतीलाही नाचवले, डान्सचे कारणही हैराण करणारे म्हणाल....
उत्तर प्रदेश – लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि तितकाच महत्त्वाचा क्षण असतो. पण अलीकडे मुलींच्या अपेक्षा प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातच जर वराला सरकारी नोकरी असेल तर त्याचा भाव खुपच वाढतो त्याचीच आठवण देणारा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
मुलाला सरकारी नोकरी असावी अशी वधूच्या आई वडिलांची इच्छा असते. वधूला देखील आपला नवरा सरकारी नोकरी करणारा असावा, असे वाटत असते. कधी कधी जर वराला सरकारी नोकरी असेल आणि त्याचे वय जरी जास्त असले तरीही मुली लग्नाला तयार होतात. सध्या व्हायरल व्हिडीओ याचेच उदाहरण देणारा आहे. एका ४० वर्षांच्या शिक्षकाने चक्क २४ वर्षीय तरुणीसह लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर दोघंही भरमंडपात आनंदात नाचताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, वधू आणि वर यांच्या वयात खूप मोठा फरक आहे. त्यांच्यामध्ये १६ वर्षाचे अंतर असूनही वधू तिच्या वराला पाहून आनंदाने नाचताना दिसत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये जोडप्याचे वय आणि वधूचा उत्साह नमूद करण्यात आला आहे. वर ४० वर्षांचा बीपीएससी शिक्षक आहे. याचा अर्थ त्याला एक सुरक्षित सरकारी नोकरी आहे. त्यामुळेच त्याचे इतक्या लहान वयाच्या मुलीशी लग्न जमले, असा दावा काही जण करीत आहेत. तर काहीजण त्यामुळेच नवरी आनंदाने नाचत आहे, असा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओत दोघेही ‘धार कमर राजाजी’वर उत्साहाने नाचताना दिसत आहे. त्यात वधूचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे आणि ती भरमंडपातच गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावताना दिसत आहे. अनेक युजर्स या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स करत आहेत.
मयंक कुमार पटेल नावाच्या इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अनेकांनी याला सरकारी नोकरीची कमला असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. पण व्हिडीओ मात्र तुफान व्हायरल होत आहे.