Latest Marathi News
Ganesh J GIF

ब्रेकिंग! आमदार अमोल मिटकरी होणार राज्याचे गृहमंत्री

अमोल मिटकरींना लागली मंत्रीपदाची लाॅटरी, अजितदादांचे मानले आभार, नक्की काय घडले?

मुंबई – राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असून देवेंद्र फडवणीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाबरोबर गृहमंत्री पद देखील आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे लवकरच गृहमंत्री होणार आहेत. पण ते एका चित्रपटात हे पद भुषवणार आहेत.

आमदार अमोल मिटकरी आता एका मराठी चित्रपटात गृहमंत्र्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. ‘बिल्लोरी’ या चित्रपटातून मिटकरी रील लाइफमध्ये ‘मंत्री’ होण्याचा अनुभव घेणार आहेत. या चित्रपटात अमोल मिटकरी यांनी ‘आप्पासाहेब पाटील’ नावाच्या गृहमंत्र्याची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे निर्माते प्रशांत मानकर असून, दिग्दर्शनाची धुरा सुनिल शिरसाठ यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण २०२४ मधील लोकसभा निवडणुकांच्या आधी अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयात पार पडले होते. आता हा चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहे. राजकारणात अमोल मिटकरींना २०२० मध्ये आमदारकीची संधी अजित पवार यांनी दिली होती. चित्रपटाच्या शुटिंगबद्दल बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “गाड्यांचा ताफा, पोलिसांचा सॅल्युट, हे सर्व अनुभवणं खूपच रोमांचक होतं. काही काळासाठी का होईना, मंत्रिपदाचा फील आला, रियल लाईफमध्येही गृहमंत्री व्हायला नक्कीच आवडेल. पण एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आपण आमदार केलं, हेच अजितदादांचे उपकार मी कधीच विसरणार नाही.” अशी प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली आहे. आपल्या वकृत्वाबरोबर अभिनयातही आपली छाप पाडतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विधानपरिषदेचे आमदार झालेल्या मिटकरींनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर आपल्या भाषणांनी वेगळी ओळख निर्माण केली. २०२४ मध्ये राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त होती. पण अमोल मिटकरींचे नाव मंत्रिपदाच्या यादीत नव्हते. पण आता पडद्यावर का होईना अमोल मिटकरी गृहमंत्र्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!