Latest Marathi News
Ganesh J GIF

विंग कमांडरची तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

कमांडरचे तरुणावरच आरोप, सीसीटीव्ही फुटेजमुळे बिंग फुटले, कमांडरवर गुन्हा दाखल, पत्नी कारणीभूत?

बेंगलोर – बंगळुरूमध्ये पत्नीसह विमानतळावर जात असताना एका दुचाकीस्वाराने कार अडवून शिवीगाळ केली आणि रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याचा आरोप भारतीय हवाई दलाचे अधिकारी, विंग कमांडर शिलादित्य बोस यांनी केला होता. पण आता त्यात धक्कादायक खुलासा झाला आहे.

बोस यांनी काल व्हिडिओ अपलोड करत स्वतः ला आणि पत्नीला मारहाण केल्याचा आरोप केला होता. यावेळी त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे दिसत होते. पण आता याला वेगळे वळण मिळाले आहे. कारण आता बोस यांच्याविरोधातच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगळुरू पोलिसांनी दुचाकीस्वाराच्या तक्रारीनंतर बोस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे यात बोस यांनीच मारहाणीला सुरूवात केल्याचं दिसत आहे. तेव्हा दुचाकीस्वाराला भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. त्यांची पत्नीही रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचबरोबर दुचाकीस्वाराने सांगितले की, तो दुचाकीवरुन जात असताना कारमधील महिलेने काही टिप्पणी केल्यामुळे त्याने पुढे गाडी थांबवली आणि अधिकाऱ्याला मॅडम काय बोलत आहेत असे विचारले, त्यानंतर वाद झाला , सुरूवात बोस यांनी केली, असा दावा केला आहे. दरम्यान सोमवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास अधिकारी बोस त्यांच्या DRDO क्वार्टर्समधून केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होते. त्यांची पत्नी गाडी चालवत होती आणि ते तिच्या शेजारी बसले होते. त्यावेळी त्या दोघांमध्ये आणि एका बाइकस्वारामध्ये वाद झाला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला केला. ही रोड-रेजची घटना आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे, ” असे पोलीस उपायुक्त (पूर्व) देवराज डी यांनी सांगितले आहे.

https://x.com/sharathmsharma/status/1914327303343231402?t=melvTfa5r1JOikMKfTK54Q&s=19

आपली पत्नी स्क्वॉड्रन लीडर मधुमिता हिच्यासह कारमधून विमानतळावर जात असताना अचानक मागून आलेल्या एक दुचाकीने आमची गाडी अडवली. त्या व्यक्तीने कन्नडमध्ये मला शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर हल्ला केला असा आरोप केला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!