
लग्नात वहिनीने केले असे काही ही सगळे पहातच राहिले
वहिनीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, लग्नात नवरीपेक्षा वहिनीचा हवा, एकदा बघाच!
पुणे – लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करत असतात.
प्रत्येक लग्नात एक वेगळीच धमाल दिसून येते. नवरा- नवरी असो वा त्यांच्या कुटुंबियातील प्रत्येक सदस्य सर्व असे फुल उत्साहात असतात. लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. त्यात लग्नासारख्या कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. सध्या सर्वत्र लग्न मोठ्या थाटात होताना दिसत आहे. लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद… हाच आनंद साजरा करण्यासाठी लग्न सोहळ्यात मोठ्या उत्साने मंडळी डान्स करतात. असाच एक व्हडिओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, गोरी गौरी गोरी गौरी मांडवाखाली” या मराठी गाण्यावर एका महिलेने भन्नाट डान्स केला आहे. यावेळी नवरा देखील तिला दमदार साथ देताना दिसत आहे. वहिनींच्या डान्स स्टेप्स पाहून वऱ्हाडी मंडळींनी टाळ्या-शिट्ट्यांचा पाऊस पाडलेला दिसत आहे.वहिनींच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील महिलेने आपल्या डान्स स्टेप्समधून संपूर्ण कार्यक्रमातील पाहूण्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर यूजर्स अप्रतिम प्रतिक्रिया देत आहेत.
हा व्हिडीओ @shama official या इन्स्टा अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यात महिलेचे आणि तिच्या जोडीदाराचे काैतुक करण्यात आले आहे. अनेकांनी काैतुकास्पद कमेंट केल्या आहेत. एकंदरीत लग्नात वहिनी जास्त भाव खाऊन गेल्या आहेत.