Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्नात नवरीने पाहुण्यांना विसरून केले असे काही की….

नवरीचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, नवरदेवही पडला फिका, एकदा बघाच....

पुणे – लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असतो. हा दिवस अविस्मरणीय आणखी खास करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यात सध्या लग्नात वऱ्हाडी मंडळींसोबतच नवरा-नवरींनी डान्स करायचाही ट्रेन्ड आला आहे. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

विवाह म्हणजे फक्त दोन जीवांचा एकत्र येणं नाही, तर दोन कुटुंबं, दोन संस्कृती आणि दोन हृदयांचं मिलन असते. हल्लीच्या काळात नववधू सजून मंडपात नवरदेवाची वाट पाहण्याऐवजी संपूर्ण वऱ्हाडी मंडळींसमोर आपलं प्रेम व्यक्त करणं पसंत करत असतात. सोशल मीडियाच्या जगात असे बरेच व्हिडीओ येत आहेत. वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात. अशाच एका नवरीचा डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, कामावर जायला उशीर झायला. कामावर जायला उशीर झायला. बघतोय रिक्षावाला गं. वाट माझी बघतोय रिक्षावाला” या गाण्यावर नवरदेव आणि नवरीनं आपल्याच वरातीत भन्नाट डान्स केला आहे. नवरीचा डान्स पाहून तिथे असलेला प्रत्येकजण हैराण झालेला आहे तर नवरी सर्वांना विसरुन आनंदाने डान्स करत आहे. यावेळी नवरदेव देखील नवरीपुढे फिका वाटत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ insta_trending_kings नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण नवरा-नवरीच्या डान्सचं कौतूक करताना दिसत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!