
खासदार असलेल्या माजी क्रिकेटपटूच्या पत्नीचे चित्रपटसृष्टीत पुनरागमन
तब्बल दहा वर्षांनी केले चित्रपटात काम, दहा वर्षातील अनुभव सांगताना अभिनेत्री भावुक, म्हणाली अशी गोष्ट माझ्यासोबत....
चंदीगड – माजी क्रिकेटपटू खासदार हरभजन सिंगची पत्नी अभिनेत्री गीता बसराने जवळजवळ एक दशकाच्या दीर्घ कालावधीनंतर ‘मेहेर’ या पंजाबी चित्रपटाद्वारे जोरदार पुनरागमन केले. राकेश मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यावेळी तिने पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त करत अनेक खुलासे केले आहेत.
हरभजन सिंग आणि गीता बसरा यांनी २०१५ मध्ये लग्न केले आणि २०१६ मध्ये त्यांची मुलगी हिनायाचा जन्म झाला. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत गीताने तिच्या मुलीच्या जन्मानंतर झालेल्या दोन गर्भपातांबद्दल माहिती दिली आहे. गीता बसराने ‘हॉटरफ्लाय’सोबत संवाद साधला. त्यादरम्यान, तिने तिच्या प्रेग्नंसीविषयी उघडपणे सांगितलं. मुलीच्या जन्मानंतर तिचा दोन वेळा गर्भपात झाला होता.त्या कठीण काळाविषयी सांगताना गीता बसरा म्हणाली,” मी दोनदा प्रयत्न केला होता पण दोन्ही वेळा गर्भपात झाला. हा माझ्या आयुष्यातील कठीण काळ होता.मी अगदी तंदुरुस्त होते,योगा करत होते. शिवाय खाण्याकडेही योग्य लक्ष दिलं होतं. मग काय चूक असू शकते. माझा गर्भपात का झाला हेच मला कळालं नाही. पण जेव्हा ते घडले तेव्हा मला खूप धक्का बसला. मी विचार केला, मला हे कधीच अपेक्षित नव्हते, कारण हिनायाच्यावेळी असे काही झाले नाही.” ती म्हणाली की तिच्या पहिल्या बाळाच्या वेळेस तिला कोणताही त्रास झाला नाही, सगळं नीट झालं. परंतु, “जेव्हा मी तीन वर्षांनी गर्भवती राहिले आणि गर्भपात झाला तेव्हा मला ते अपेक्षित नव्हते. मूल गमावणे कठीण आहे, परंतु ते सहन करण्यासाठी मानसिक शक्ती लागते. यावेळी तिने हरभजनच्या पाठिंब्याबद्दलही सांगितले. दरम्यान गीता बसरा आणि हरभजन सिंग या दोघांना आता एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विशेष म्हणजे मुलांना सांभाळण्यासाठी तिने सिनेसृष्टी सोडली. गीता बसराने २९ ऑक्टोबर २०१५ रोजी हरभजन सिंगबरोबर लग्न केलं. या विवाहसोहळ्यात त्यांचे काही मित्रमंडळी आणि कुटुंबीय सामील झाले होते.
शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांनी ‘मेहेर’ या पंजाबी चित्रपटातून पदार्पण केले आहे. या चित्रपटापूर्वी गीता बसराने कुटुंबाची काळजी घेण्यासाठी कामातून ब्रेक घेतला होता. ‘मेहेर’पूर्वी त्यांचा शेवटचा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याचे नाव ‘लॉक’ होते.