Latest Marathi News
Ganesh J GIF

आईचा जीव घेतला अन् म्हणाला “वैतागलो होतो!”

र्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमधून नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली. राजराजेश्वरी नगर परिसरात एका मुलाने आपल्या ७२ वर्षीय वृद्ध आणि अर्धांगवायूने आजारी असलेल्या आईला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून तिची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या मुलाला ताब्यात घेतले असून पोलीस तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला गेल्या काही काळापासून अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळलेली होती. तिला दैनंदिन कामांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत होते. आरोपी मुलगा तिच्या प्रकृतीमुळे आणि तिच्या देखभालीमुळे त्रस्त झाला होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेच्या दिवशी, आरोपीने आपल्या आईला चौथ्या मजल्यावर नेले आणि तिथून तिला खाली ढकलून दिले. उंचावरून पडल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच राजराजेश्वरी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला हा अपघात किंवा आत्महत्या असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आले. आईच्या आजारपणाला वैतागून मुलाने तिची हत्या केल्याची कबूली दिली. आईच्या आजारपणामुळे आलेला कंटाळा की, मालमत्तेचा वाद या दोन्ही कोनातून पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, पोटच्या मुलानेच अशा क्रूरपणे आईचा जीव घेतल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!