
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी (16 एप्रिल) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 13 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी 12 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक दिग्गजांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या जागांवर पुन्हा कोणाची वर्णी लागणार आणि राजकीय समीकरणे कशी बदलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026 (गुरुवार)
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल2026 (गुरुवार)
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026 (शनिवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026 (सोमवार)
मतदानाची तारीख: 12 मे 2026 (मंगळवार)
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 (मंगळवार) संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026 (बुधवार)


