
नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक राजकारणांशी घनिष्ट संबंध असल्याचे समोर आणल्यानंतर खरातला कोणी आणि कितीवेळा फोन केले त्याची यादीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी समोर आणली.

यामध्ये पहिल्या क्रमाकांवर खरातची मुलगी असून दुसऱ्या क्रमाकांवर रूपाली चाकणकर यांचा क्रमांक असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. खरात आणि चाकणकर यांच्यात तब्बल ३३ हजार ७२७ सेकंद संभाषण झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. चाकणकर आणि खरातचे संबंध किती घनिष्ठ होते याची माहिती दमानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. खरातला कॉल केलेल्यांची यादीच त्यांनी जाहीर केली. यामध्ये पहिल्या १० जणांच्या यादीत रूपाली चाकणकर यांचा नंबर दुसऱ्या क्रमांकावर आहे. चाकणकर यांनी खरात याला एकूण १७७ फोन केले होते. यामध्ये इनकमिंग कॉल्स ११९ आणि आऊटगोईंग कॉल्स ५८ आहेत. एके दिवशी चाकणकर यांनी खरातसोबत २२ मिनिटे बोलत होत्या, असे सांगत दमानिया यांनी त्यांच्या कॉल्सचे पुरावे दाखवले.


