Latest Marathi News
Ganesh J GIF

मुलीसोबत जाणाऱ्या तहसीलदारांना रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी

अवैध वाळू उपशाचा मुद्दा धाराशिव जिल्ह्यात चांगलाच तापला असून, परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात चक्क तहसीलदारांना गाडी अडवून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहसीलदार निलेश काकडे आणि तक्रारदार यांच्यातील या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेच्या निषेधार्थ महसूल संघटनेने काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

मिळालेली माहिती अशी की, तहसीलदार निलेश काकडे हे आपल्या चिमुकल्या मुलीसह शासकीय गाडीतून जात असताना एका तक्रारदाराने त्यांची गाडी अडवली. अवैध वाळू उपशाविरोधात मी दिलेल्या निवेदनावर काय कारवाई केली? असा सवाल करत तक्रारदाराने तहसीलदारांशी हुज्जत घातली. “आत्ताच कारवाई कर, नाहीतर तुला जीवे मारून टाकेन” असं म्हणत थेट धमकी तहसीलदारांना देण्यात आल्याचा आरोप तहसीलदार काकडे यांनी केला आहे. यावेळी दोघांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. विशेष म्हणजे तहसीलदार आपल्या लहान मुलीसोबत असताना हा प्रकार घडल्याने त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!