Latest Marathi News
Ganesh J GIF

अयानचा मास्टर प्लॅन समोर!; प्रेमाच्या जाळ्यात कसं ओढायचं?

मुली पटवण्यावरून लागलेली पैज आणि कॉलर टाइट करण्यासाठी जास्तीत जास्त मुलींना जाळ्यात ओढण्याचा डाव असल्याचं धक्कादायक सत्य अमरावतीच्या व्हिडीओ कांडमधून समोर आलं आणि महाराष्ट्र हादरला.

मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी तो हाय हॅलो नाही तर असे प्रश्न विचारायचा की ज्यामुळे मुलींना त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल.

त्यामुळे संवाद होईल आणि मुलींना आपल्या जाळ्यात ओढणं आणखी सोपं होईल असा डाव होता. परतवाडा इथे अयान अहमद याने विकृतीचा कळस गाठला. सोशल मीडियाचा वापर करून मुलींना जाळ्यात ओढणं, त्यांच्याशी अश्लील चाळे करून त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढले. मात्र पैशांवरून वाद झाल्यामुळे मित्रानेच हे फोटो व्हिडीओ व्हायरल केले आणि धक्कादायक कांड समोर आलं.

पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून तपासात एकापेक्षा एक मोठे खुलासे या प्रकरणात केले आहेत. पोलीस तपासात समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे.

अयानने मुलींना पटवण्यासाठी लव्ह गुरूची मदत घेतली होती. हा गुरू त्याला सांगायचा की, “मुलींना साधे हाय-हॅलो मेसेज करू नकोस, त्यांना असा प्रश्न विचार ज्याचं उत्तर देणं त्यांना भाग पडेल.” अयान मुलींना “आप वहीं हो ना, जो वहां मिले थे?” असे मेसेज करून बोलण्यासाठी सुरुवात करायचा. ओळख नसतानाही केवळ कुतूहलापोटी मुली उत्तर द्यायच्या आणि तिथूनच अयानच्या जाळ्यात अडकायच्या.

अयानने केवळ मुलींना जाळ्यात ओढलं नाही, तर त्यांच्यावर लैंगिक अत्याचारही केले. किती मुली पटवल्या याचे पुरवे म्हणून त्याने मुलींसोबतचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले. या सगळ्यासाठी अमरावती शहरातील एका फ्लॅटचा वापर केला. हा फ्लॅट त्याला मानव सुगंधी नावाचा तरुण देत होता अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अयान आणि मानव यांची थेट ओळख नव्हती.

पियुष नावाच्या एका मध्यस्थाच्या माध्यमातून अयानने मानवशी संपर्क साधला होता. प्रत्येक भेटीसाठी अयान मानवला ५०० रुपये द्यायचा. गेल्या वर्षभरात ७ ते ८ वेळा अयानने या फ्लॅटचा वापर केला होता. पोलिसांनी १६ एप्रिल रोजी मानव सुगंधीलाही अटक केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!