Latest Marathi News
Ganesh J GIF

कोंढव्यात एकतर्फी प्रेमातून हल्ला: पाठलाग करून तरुणीला गाठलं आणि बदडलं; माथेफिरूच्या धमकीनं पुणे हादरलं.

तरूणीने लग्नासाठी नाही म्‍हटल्‍याचा रागातून तरूणीचा पाठलाग करून तिला व तिच्‍या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच तिला तु माझी नाही झालीस, तर कुणाचीज होऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे.

याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३० वर्षीय पीडित तरुणीने तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने तिचा वारंवार पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिला आहे. जानेवारी २०२६ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. आरोपीने पीडितेचा वारंवार पाठलाग केला आणि तिच्या घरात शिरून तिला मारहाण केली. “जर तू माझी झाली नाहीस, तर मी तुला कुणाचीच होऊ देणार नाही आणि तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी त्याने दिली. तसेच आरोपीने पीडितेच्या आईलाही शिवीगाळ केली असून, वारंवार फोन करून तिचा छळ केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रसाद जाधव करत आहेत.

तरुणींचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग

अमरावतीच्या परतवाडा येथील व्हिडीओ व्हायरल प्रकरण चर्चेत असतानाच आता कोल्हापुरात देखील युवतींचे व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे याला या प्रकरणी अटक करण्यात आली, न्यायलयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तरुणीवर अत्याचार करून व्हिडीओ मित्राला शेअर केल्याचं उघड झालं आहे. तर आरोपी शाहिद सनदे याच्याकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ असल्याचा पोलिसांना संशय आहे. शाहिदचा मित्र शाहरुख देसाई मात्र फरार झाला आहे, पोलिसांचा शोध सुरू आहे. कारवाई करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजाकडून देखील पोलिसांकडे मागणी करण्यात आली आहे. शाहिद समीर सनदे (रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) याने तरूणीवर अत्याचार करून तिचे व्हिडीओ बनवून मित्रांना शेअर केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत पिडीत तरूणीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केले. त्याला हातकणंगले पोलिस ठाण्याकडे सोपविण्यात आल्यानंतर येथे गुन्हा दाखल केला. हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी त्याला पेठवडगाव न्यायालयामध्ये सोमवारी हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. व्हिडिओ तयार करणारा त्याचा मित्र फरार असून, त्याच्याकडे इतर युवतींचे व्हिडीओ असल्याचा संशय आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!