Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी अपडेट: महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी ‘हे’ आहेत अधिकृत मार्ग; डिजीलॉकर आणि SMS चा असा करा वापर.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेस बसलेले लाखो विद्यार्थी त्यांच्या परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.महाराष्ट्र बोर्ड लवकरच 12वी (Maharashtra HSC Board Result 2026) आणि 10वी (Maharashtra SSC Board Result 2026) बोर्ड परीक्षांच्या निकालांची घोषणा करण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात (MSBSHSE Result 2026) बोर्डाकजून एक पत्रकार परिषदेत घेऊन निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. यात दोन्ही परीक्षांमध्ये यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येसह टॉपर्सची यादी देखील जारी केली जाईल. त्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in आणि mahahsscboard.in/mr वरून आपला निकाल तपासू शकतील.

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा कधी झाली होती?

महाराष्ट्र 12वीची (HSC) बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती, तर 10वीची (SSC) बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या परीक्षांना बसलेले 14 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

महाराष्ट्र बोर्ड निकाल 2026 कधी येणार?

महाराष्ट्र बोर्डातर्फे आयोजित 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल मे मध्ये जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. हा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. बोर्डाकडून लवकरच निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करेल. परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालिक निकाल जाहीर झाल्यानंतर तो ऑनलाइन पाहू शकणार आहेत. तसेच निकालाची घोषणा बोर्डाकडून पत्रकार परिषदेद्वारे केली जाईल.

कुठे कुठे पाहता येईल 10वी 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल?

mahahsscboard.in
mahahsscboard.org
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in
results.digilocker.gov.in

महाराष्ट्र 10वी 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल कसा तपासायचा?

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट www.digilocker.gov.in वर जा.
होमपेजवर तुम्हाला Register/login टॅब दिसेल. येथे तुमचा आधार नंबर किंवा मोबाइल नंबर वापरून रजिस्ट्रेशन आयडी तयार करा.
निकाल आल्यानंतर तुम्हाला Maharashtra Board HSC Result 2026 किंवा Maharashtra Board SSC Result 2026 चा टॅब दिसेल.
तुमचा रोल नंबर, बोर्ड आणि इतर तपशील भरून SUBMIT बटणावर क्लिक करा.
तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तुम्ही त्यात तुमचे मार्क्स पाहू शकता

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

बोर्ड परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही तुमचा निकाल ऑनलाइन पाहू शकता आणि तो ऑनलाइन डाउनलोड करू शकता. परंतु ऑनलाइन डाउनलोड केलेली मार्कशीट ही तात्पुरती मार्कशीट असते. निकालानंतर ओरिजनल मार्कशीट तुम्हाला तुमच्या शाळेतून किंवा महाविद्यालयातून 10 ते 15 दिवसांच्या आत मिळेल. ती तुम्ही तेथून प्राप्त करू शकता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!